डॉ नानाभाऊ पोजगे
निमा संघटनेची धडधडणारी तोफ
*************************************
साल २००९, डिसेंबरचा महिना, वेळ संध्याकाळी ७.३० वाजताची आणि स्थळ होते सेमीनरी हिल्स चौक, नागपूर. मित्रमंडळींसोबत शनिवार पासून कर्माझरीला जंगलमे मंगल चा मनसोक्त आनंद लुटून आमची इनोव्हा नुकतीच नागपुरच्या वेशीत दाखल झाली होती. मात्र इनोव्हा भरधाव वेगाने चौकात येताच साडेसाती आमच्यावर टपून होती. सिग्नल हिरवा असल्याने चालकाने वेगाने गाडी काढली आणि अचानक दुचाकीवर एक जोडपे आपल्या मुलाबाळांसह आमच्या इनोव्हाला येऊन धडकले.
अर्थातच चालकाने करकचून ब्रेक लावले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुचाकीवरील संपूर्ण कुटुंब रस्त्यावर निपचित पडले होते. क्षणार्धात काय झाले कोणालाच कळले नाही मात्र लगेच जमाव जमला आणि एकच गोंधळ उडाला. इनोव्हामधील सर्वजण जमावाच्या तावडीत सापडायच्या धाकाने लगेच बाहेर पडले. मी मात्र मागच्या सिटवर असल्याने बाहेर पडायला थोडा उशीर झाला आणि तोपर्यंत आमची गाडी गर्दीने वेढली गेली होती. जखमींची मदत करावी की आणखी काय करावे काहीच सुचत नव्हते, निर्जीव पुतळ्यासारखे माझे पाय जमिनीवर थिजले होते.
इतक्यात एक पहाडी आवाज जमावावर गरजला. सगळे मागे व्हा, आम्ही सगळ्या जखमींना रुग्णालयात घेऊन जातो. खरोखरच हा आवाज मला आकाशवाणी, देववाणी सारखा वाटला.इतक्या अटीतटीच्या प्रसंगी जमावाला एका वाक्यात काबू करण्याची करामत केली होती ती डॉ नानाभाऊंनी दाखविलेल्या एका प्रसंगावधानामुळे. लगेच चारही जखमींना आम्ही इनोव्हात घेतले आणि रविनगरला एका इस्पितळात दाखल केले. निश्चितच एखाद्याचे चरित्र, स्वभाव, प्रवृत्ती ओळखायची असेल तर त्यासाठी संकटकाळ हा उत्तम मार्ग होय. याच घटनेपासून आम्ही नानाभाऊंचे आजिवन जबर फॅन झालो.
नानाभाऊंचा मुळ पिंड म्हणजे समाजकारणाचा. मी आणि माझे घर या चौकटीला छेद देत हे विश्वची माझे घर या विचारांचे ते पाईक आहेत. याच भावनेतून मग कुठेही, कोणावरही, कधीही अन्याय होत असेल तर नानाभाऊ लगेच धाऊन जातात. अगदी विद्यार्थी दशेत ही त्यांनी १९७९ साली आयुर्वेद विद्यार्थ्यांवर होणाऱ्या आंदोलनात भाग घेतला आणि तब्बल १८ दिवसांचा अमरावतीच्या केंद्रीय कारागृहात कारावास सुद्धा भोगला. नानाभाऊंची जन्मभुमी अमरावती असली तरी कर्मभुमी प्रामुख्याने नागपूर राहीली आहे. इथेच नानाभाऊंच्या कर्तृत्वाला आणखी भरारी, झळाळी आली.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थातच निमा या देशव्यापी संघटनेत नानाभाऊंनी आपल्या आगळ्यावेगळ्या आक्रमक शैलीने विशेष स्थान प्राप्त केले आहे. संघटनेसाठी वाट्टेल ते करायची तयारी असल्याने वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ यांना टाळून कंपूशाही, लॉबिंग सारख्या घटनांचा नानाभाऊंनी नेहमीच खरपूस समाचार घेतला आहे. तसेही नानाभाऊ आणि वादविवादांचे सख्खे नाते आहे. मात्र वातवितंडात मतभेद असुद्या, मनभेद असु नये याकरिता ते नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. आपल्या संघटनकौशल्य आणि नेतृत्व गुणाने त्यांनी निमा नागपुरचे सचिव आणि अध्यक्षपद भूषविले आहे. राज्य कार्यकारिणी वर सहसचिव आणि उपाध्यक्ष पद तर केंद्रीत संघटन समितीचे अध्यक्षपद मोठ्या कौशल्याने सांभाळले आहे.
सामाजिक जाणिवेतून नानाभाऊंनी २००५ ला परिवर्तनवादी विचार मंचची स्थापना केली. याशिवाय भाजपा वैद्यकीय आघाडी पश्चिम नागपुरच्या अध्यक्षपदाची जबाबदारी २०१३ पासून त्यांच्याच खांद्यावर आहे. सोबतच नानाभाऊ कट्टर विदर्भवादी असून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिती कार्यात सक्रिय सहभागी आहेत. समाजातल्या गरिब, होतकरू विद्यार्थ्यांना नानाभाऊ नेहमीच सढळ हाताने आर्थिक मदत करत असतात. एवढेच नव्हे तर गरजू रुग्णांसाठी आणि आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सहायतेसाठी उभारलेल्या मानव सेवा समितीचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत.
एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असुनही नानाभाऊ कायम ह्रदयात स्थानापन्न झाले आहेत ते एक दिलदार आणि सच्चा मित्र म्हणून. अर्थातच नानाभाऊंशी मैत्री करताना लहान-मोठे, जेष्ठश्रेष्ठ याची गरजच भासत नाही. जिथे विचार जुळतात,तिथे इतर बाबी गौण ठरतात. असे असले तरी उदारमतवादी असलेले नानाभाऊ समता, बंधुत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. अन्यायाचा सामना करतांना कोणाचीही भिड, मुर्वत न ठेवता जे योग्य आहे त्याचाच आग्रह धरत समोरच्याला निरूत्तर करतात.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर निमा हिंगणा शाखा स्थापन करण्यात नानाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. हिंगणा शाखेचे ते आधारस्तंभ, आधारवड आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हिंगणा शाखा सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. ते आम्हाला गुरूसमान आहेत. मात्र एक निर्गुण निराकार योग्याप्रमाणे ते श्रेय घेण्यापासून चार हात लांबच राहतात. मी कोणाचा गुरू नाही, माझे कोणीही चेले नाही या उक्तीला ते तंतोतंत जागतात. आज नानाभाऊंचा वाढदिवस, एक जिवलग मित्र, एक स्नेही, एक गुरु, एक आप्त, एक बंडखोर व्यक्तिमत्त्व, एक न्यायाचा आवाज, निमा संघटनेची लाईव्ह वायर किंवा सतत धडधडणारी मुलुख मैदानी तोफ,,असे एक ना अनेक विशेषण लाभलेल्या या मुर्तीला आपण सर्व मित्रपरिवारा तर्फे वाढदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा.
***********************************
दि. ७ जानेवारी २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
452 4.2.2 The email account that you tried to reach is over quota. Please direct the recipient to https://support.google.com/ |
Show quoted text
| ||||
| The response was: 452 4.2.2 The email account that you tried to reach is over quota. Please direct the recipient to https://support.google.com/ |
Show quoted text
| ||||
| The response was: 452 4.2.2 The email account that you tried to reach is over quota. Please direct the recipient to https://support.google.com/ |
Show quoted text
No comments:
Post a Comment