@#😈😈😈😈😈😈😈#@
*आरोग्यसेवा ऑनलाईन २०५०*
********************************
रूग्ण,नातेवाईक, समाजकंटक यांच्याकडून होणारी मारहाण जीवघेणे हल्ले, हल्ल्याचे सरकार न्यायसंस्थेकडून होणारे निर्लज्ज समर्थन, मिडीयाकडून होणारी गळचेपी मुस्कटदाबी, कुचकामी कायदे आणि २४ तास प्रचंड तणाव दबावात राहणे अशक्य झाल्याने इसवी सन २०५० पर्यंत भारतात डॉक्टर नावाची जमात जवळपास नामशेष झाली असेल. त्या काळची आरोग्य सेवा काय असेल याचा ठोकळ अंदाज असा घेता येईल.
जवळपास बहुतेक सर्व डॉक्टर मंडळी आपला व्यवसाय सोडून इतर व्यवसायात रमलेले आढळतील. वृद्ध मायबाप आपली मुलेबाळे वैद्यकीय व्यवसाय सोडून इतरत्र उद्योगधंद्यात गुंतलेली पाहून देवाचे आभार मानत असतील.सरकारतर्फे हल्ल्यात मरण पावलेल्या डॉक्टरांच्या कुटूंबीयांसाठी निराधार योजना चालविली जाईल. बहुतेक डॉक्टर हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी कुटूंबीय करतील.
छोटे क्लिनीक, खाजगी नर्सिंग होम जवळपास नामशेष झालेले असतील आणि मोठे हाॅस्पीटल तोडून तिथे जंगी माॅल, शोरुम उघडलेले दिसतील. समजा एखादे मोठे हाॅस्पीटल उरलेच असेल तर सरकार त्याला वैद्यकीय पर्यटनस्थळ म्हणून घोषीत करेल. इथे चुकुनमाकून डॉक्टर होणाऱ्यांना हल्ल्यापासून बचावाचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच इथे बळी पडलेल्या डॉक्टरांचा स्मृतीस्तंभ उभारलेला दिसेल.
दरम्यान डॉक्टर होण्यास कुणीच तयार नसल्याने सरकार विविध आकर्षक योजना आणेल. प्रवेश घेताच वैद्यकीय विद्यार्थ्यांना हेल्मेट,चेस्ट गार्ड, मिर्ची स्प्रे मोफत मिळेल. कमांडो ट्रेनिंग सोबतच रजिस्ट्रेशनच्या पहिले गन लायसन्स ची सुविधा, पेंशन योजना, मरणोत्तर शौर्यचक्र, विविध पारितोषिकांचे आमिष दिल्या जाईल.
आरोग्यसेवा संपुर्ण ऑनलाईन झाल्याने उपचाराकरीता ४२० या हेल्पलाईनवर काॅल केल्यास असे उत्तर मिळेल. साध्या आजाराकरीता एक दाबा, अपघाता करीता दोन दाबा, डीलीव्हरी करीता तिन दाबा, कोणत्याही ईमरजन्सीकरीता चार दाबा, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलायला पाच दाबा. प्रशिक्षणासाठी आपला काॅल रेकाॅर्ड केल्या जाऊ शकतो. आरोग्यसेवेचा लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद.
दरम्यान प्रत्येक हाॅस्पीटल सरकारच्या ताब्यात असतील,,, प्रवेशद्वाराजवळ मेटल डीटेक्टर बसवलेले असतील. सुरक्षा रक्षक चांगली अंगझडती घेतल्याशिवाय कुणालाही प्रवेश नाकारतील, डॉक्टर नखशिखांत बुरख्यात असतील. ओळख पटू नये म्हणुन डॉक्टर नावाऐवजी केवळ सर्व्हिस कोड नंबर वापरतील,,,,जो रोज बदलत जाईल.
दरम्यान पहिले सारखी वैद्यकीय सेवा २४ तास उपलब्ध नसल्याने उपचारावाचून रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढलेले असतील. बाळाला जन्म द्यायचा असल्यास रूग्णालयात आधी बुकींग करावे लागेल आणि व्हॅकन्सी असेल तरच प्रेग्नन्सी ठेवायचा अधिकार मिळेल. बुकींग न करता प्रेग्नन्सी राहीलीच तर सरकारची अवमानना ठरवून गर्भपात केला जाईल. मिलीटरी कॅम्प सारखे हाॅस्पीटलला संरक्षण असल्याने डॉक्टरवरील हल्ल्यात लक्षणीय कमी आलेली असेल.
डॉक्टरांसाठी एवढे करुनही मॅरेज ब्युरो मध्ये डॉक्टर मुला मुलींनी कृपया आवेदन करू नये अशा स्पष्ट सुचना लिहीलेल्या आढळतील. ज्यांचे पुर्वज वैद्यकीय क्षेत्रात होते त्यांच्याकडे समाज त्याही वेळेस गुन्हेगारी नजरेने पाहण्यास कमी करणार नाही. शेवटी कधीकाळी डॉक्टर निर्यात करणारा आपला देश डॉक्टर आयात करू लागेल.
आतंकवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती,,भुकंप,त्सुनामी ,चक्रीवादळ, अपघात इत्यादी कारणांमुळे होणारे मृत्यु पाहून हळूहळू जनतेला डॉक्टरांच्या उपचारा शिवाय पण मृत्यु होऊ शकतो यावर विश्वास वाढेल. आपल्या जुन्याजाणत्या मंडळींकडून पहिल्या काळी २४ तास सर्वत्र वैद्यकीय सेवा उपलब्ध होती हे ऐकून विश्वास वाटणार नाही. होऊ शकते एवढी सर्व उलथापालथ झाल्यावर रुग्ण,नातेवाईकांना डॉक्टरांची किंमत कळेल आणि वैद्यकीय क्षेत्राला परत चांगले दिवस येतील.
*********************************
दि. २६ मार्च २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment