@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*द काश्मीर फाईल्स, उत्तरार्ध*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
या चित्रपटाला अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार आदी दिग्गजांनी आकार दिला असला तरी सर्वात जास्त प्रभावित केले ते पल्लवी जोशीने. प्रोफेसर राधिका मेननच्या व्यक्तीरेखेला तिने अक्षरशः जिवंत केले आहे. जितकी हानी आतंकवाद्यांनी केली नसेल त्याच्या कैकपटीने हानी राधिका मेनन सारख्या स्लिपर सेलने केली आहे. युवावर्ग विशेषतः विद्यार्थ्यांना भ्रमित करुन त्यांच्या मनात देशविरोधाची बीजे रोवून देश पोखरण्याचे पातक डाव्या कंपूने पद्धतशीरपणे केले आहे. कधी बुरहाण वाणीची भगतसिंगांशी तुलना करत तर कधी भारतीय लष्कराला खलनायक ठरवत या हरामखोरांनी या देशालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
विशेषतः बडी बिंदी गॅंगचे प्रतिरूप साकारतांना पल्लवी जोशीने आपल्या सशक्त अभिनयाने प्रो.राधिका मेनन उभारली आहे. तिला पडद्यावर पाहताच राग, द्वेष, संताप, चिड अशा भावना मनात गर्दी करतात. सोबतच असल्या आस्तिनीतल्या सापांचा पहिले बंदोबस्त करणे किती गरजेचं आहे हे कळून येते. तिच्या तोंडचे,, काश्मीर भारताचा अविभाज्य अंग नाही, जगाच्या नकाशाप्रमाणे काश्मीर भारतात नाही, आय ॲम गोईंग टू नोव्हेअर लाईक धिस कंट्री, गव्हरमेंट भलेही उनकी हो, सिस्टम तो हमारा है, लाजिम है की हम भी देखेंगे,, इत्यादी संवाद प्रेक्षकांच्या डोक्यात सनक आणल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे ती कृष्णा पंडितला विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार करुन काश्मिरात अजेंड्यानुसार रिपोर्टींगला पाठवते. जिथे तिचे क्रुरकर्मा बिट्टा कराटेशी लागेबांधे असतात.
खरेतर इथेच या लिब्रांडूंचे आतंकी कनेक्शन उघड होते. प्रो राधिका मेननचा बिट्टा कराटे सोबतचा फोटो,,, यासिन मलिक आणि अरूंधती रायच्या फोटोची हुबेहूब प्रतिकृती असते. चिन्मय मंडलेकरने बिट्टा कराटेला साकारताना आपला अभिनय पणाला लावला आहे. अतिशय थंड डोक्याने तो हत्याकांड घडवतो आणि निर्लज्जपणे कबूली देतो. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडात त्याचे नराधम रुप पाहून काळीज थिजून जाते. छोटी मुले, स्त्रीया, वृद्धांना संपविताना पश्चात्तापाचा किंवा भितीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नसतो.
दर्शन कुमारने साकारलेला कृष्णा पंडित हा खरेतर आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो. सुरवातीला वैचारिक गोंधळात अडकलेला कृष्णा पंडित जेंव्हा जळजळीत वास्तवाला सामोरा जातो तेव्हा त्याचा अभिनय खुलून दिसतो. काश्मीर नरसंहार बाबत इतके वर्ष दडवून ठेवलेले सत्य जसजसे बाहेर यायला लागले तसतसे प्रेक्षकांचे ह्रदय पिळवटून निघते. त्यावेळी सुद्धा मिडीया होता परंतु घडलेला नरसंहार त्यांच्या अजेंड्याला साजेसा नसल्याने त्याची फारशी दखल घेतली जात नाही.
अनुपम खेर यांनी आपल्या कसदार अभिनयाने पुष्करनाथ पंडितची व्यथा मांडली आहे. डिजीपी, आएएएस अधिकारी, डॉक्टर आणि मिडीया सहकारी सोबत असुनसुद्धा आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकलो नाही याचे शल्य त्याला आयुष्यभर असते. त्यातच नातू कृष्णा आझादी गॅंगच्या विळख्यात सापडल्याने तो उद्विग्न होतो. टुटे हुऐ लोग बताते नहीं उन्हे सुना जाता है, काश्मीर का सच हमेशा झुठ ही लगता है, लोग अखबार देखते है पढते नहीं, टीव्ही देखते है पर समझते नहीं, सपने पुरे नहीं होते उनके पिछे भागना पडता है, इम्पॉसिबल टेकस टाईम,, इत्यादी संवादातून काश्मीर नरसंहाराचे कटू सत्य मांडले जाते.
या सत्यपटाचा परमोच्च बिंदू म्हणजे कृष्णा पंडित चे जेएनयूतले भाषण. ढोंगी पुरोगाम्यांचा खरपुस समाचार घेत तो काश्मिरींचे वास्तव सर्वांसमोर मांडतो. ॠषी कश्यप पासून सुरू झालेली ही मालिका कान देऊन ऐकण्यासारखी आहे. शंकराचार्य असो की केरळ कश्मिरचे आध्यात्मिक संबंध असो, चरक सुश्रुत वाग्भट आदी आयुर्वेद महर्षींचा उल्लेख असो की विष्णू शर्माचे पंचतंत्र असो, नाट्यशाळा, भारतमुनी ,,, इतिहासाच्या गर्भात दडलेल्या आणखी काही महत्वाच्या बाबी असो,, धर्मांधांना काश्मीर आंदण देऊ पाहणाऱ्यांच्या डोळ्यात ते झणझणीत अंजन असते.
मुख्य म्हणजे काश्मिरची भुमी जणुकाही १९४७ नंतर अस्तित्वात आली असे ज्यांना वाटते त्यांनी हा चित्रपट एकदा जरूर पहावा. कश्मिर इज ए क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन, कश्मिर वॉज सेंटर ऑफ नॉलेज असे का म्हणतात ते लगेच कळून येईल. काश्मिरात नरसंहारा सोबतच सांस्कृतिक संहारही कसा झाला याचा ही विचार केला पाहिजे. मुख्य म्हणजे ज्यांच्यात ढोंगी पुरोगामीत्वाचा किडा जास्त वळवळत आहे त्यांच्यासाठी द काश्मीर फाईल्स हा रामबाण इलाज आहे. दुष्ट राजकारणी, हतबल प्रशासन, दुटप्पी,लाचार मिडीया आणि आपल्याच देशबांधवांबाबत असलेली कमालीची अनास्था या सर्वांचे एकत्र रुप बघायचे असेल तर द काश्मीर फाईल्स एकदा नक्की बघायला हवा.
**********************************
दि. २० मार्च २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment