Tuesday, April 11, 2023

तनिष्क तुने ये क्या किया?



       तनिष्क, तुने ये क्या किया?
           डॉ अनिल पावशेकर
*************************************
कोरोनाने सध्या आपली वळवळ कमी केली असली तरी आपल्याकडे सतत वळवळणाऱ्या ढोंगी सेक्युलॅरिझमने पुन्हा एकदा उचल खाल्लेली आहे. अर्थातच ढोंगी सेक्युलॅरिझम म्हटले की एका विशिष्ट धर्माचा उदोउदो आणि हिंदुत्वाची टिंगलटवाळी  करण्याचा अलिखित नियमच आहे. शिवाय असे केल्याने आपणच एकमेव कसे सर्वश्रेष्ठ मानवतावादी, पुढारलेले आणि समानतावादी आहोत याचे घरपोच प्रमाणपत्र मिळत असल्याने ढोंगी सेक्युलरांमध्ये याबाबतीत नेहमीच चढाओढ पहायला मिळते. सोबतच हिंदुंचे सण म्हटले की यांच्या सुप्त आणि दुष्ट मनिषा जुनाट मुळव्याधीसारख्या उफाळून येत असल्याने त्याचे विकृत रूप नेहमीच पहायला मिळते.

झाले काय तर नुकतेच भारतभर पसरलेल्या तनिष्क ज्वेलर्सने आपल्या जाहीरातीत जाणिवपूर्वक हिंदू सुनेचा मुस्लिम कुटुंबात गोदभराईचा (डोहाळजेवण) प्रसंग दाखवला आहे. अशा प्रसंगाला हिंदू, मुस्लिम तडका देण्याचे कारण काय असावे ते कळत नाही. खरेतर हा लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दिसतो. शिवाय असा खोडसाळपणा नेमके हिंदु़च्या बाबतीतच, ऐन हिंदू सणांच्या तोंडावरच का केला याबाबत सर्वत्र चिड निर्माण झाली आहे.

 वास्तविकत: कुणाला कुठे लग्न करायच, कुठे गर्भार व्हायच हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसेच तनिष्क ज्वेलर्स सारख्यांना कोणत्या धर्माला उरावर बसवायच ही त्यांची वैयक्तिक निवड आणि अधिकार आहे. असे करत असतांनाच जाणिवपूर्वक हिंदू धर्माला खिजवणे योग्य नव्हे. मात्र बहुसंख्यक हिंदुंना डिवचल्याशिवाय अशा ढोग्यांच्या बुडाची खाज मिटत नसल्याने वारंवार हिंदूंना अशा प्रकारांना बळी पडावे लागते. किंबहुना हिंदू सहिष्णू असल्याने असले प्रकार करणाऱ्यांचे चांगले फावते अशी स्थिती आहे.

तनिष्क ज्वेलर्स सारख्या ढोंग्यांनी याबाबतीत आणखी एक जाहिरात करून धर्माची अदलाबदल करुन बघावी म्हणजे सत्यपरिस्थिती काय असते हे कळून यायला वेळ लागणार नाही. मग ते बंगळूर असो की नॉर्वे, स्विडन असो. एवढ्या उचापती हिंदूधर्मा शिवाय इतरत्र केल्या असत्या तर एव्हाना देशभरातील शोरूम बंगळूर नॉर्वे पॅटर्नने जळून बेचिराख झाले असते. सोबतच बेफाम दंगेखोरांना नकली पुरोगाम्यांनी धार्मिक स्वातंत्र्यलढ्याचे सर्टीफिकेट देऊन त्यांची पाठराखण सुद्धा केली असती.

धार्मिक बाबतीत एवढा चोंबडेपणा करणाऱ्या तनिष्कला चार्ली हेब्दोचा बहुतेक विसर पडला असावा. सोबतच बामीयान ते श्रीलंका व्हाया बर्माचा विध्वंस आठवत नसावा. कमीतकमी धार्मिक बाबतीत लुडबुड करुन हिंदूंना दुय्यम स्थान देणाऱ्या तनिष्कने आयफेल टॉवर, लंडन ब्रीज आणि न्युयाॅर्कचे ट्वीन टॉवर्स जायबंदी का झाले याचा मागोवा घ्यावा आणि जरूर त्याचा उदोउदो करावा मात्र याकरिता हिंदू धर्माला वेठीस धरू नये.

अर्थातच बहिष्काराचे नाक दाबताच तनिष्कने माफी मागण्याचे तोंड जरी उघडले असले तरी असे प्रकार यापूर्वी सुद्धा घडले आहेत. मग ते सर्फ एक्सेलचे प्रकरण असो की रंगपंचमीचे रंग लावण्याचा किस्सा असो. धार्मिक चिखलफेकीत दाग नेहमीच हिंदू धर्माच्या बाबतीतच अच्छे का असतात याचा खुलासा व्हायला हवा. मग ते जाहीराती असो की चित्रपटसृष्टी असो. हिंदुंच्या मुलीबाळी म्हणजे खिरापती नव्हे हे या ढोंग्यांना ठणकावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. कुणीही यावे आणि टपली मारून जावे हे थांबवायचे असल्यास अशा ढोंग्यांविरूद्ध आर्थिक बहिष्काराचे शस्त्र उपसून चांगली अद्दल घडवणे योग्य ठरेल. 

याशिवाय याप्रकरणाला लव्ह जिहादचा जो ॲंगल आहे त्याचाही विचार मुलींनी करायला हवा. सारासार विचार न करता आपली बुद्धी गहाण ठेवली तर भविष्य किती अंधारमय असते हे वर्तमानपत्रात वारंवार येणाऱ्या बातम्यांतून सहज कळून येते. तनिष्कची ही कुटील जाहीरात म्हणजे गोदभराई नव्हे तर हिंदू बुराई आहे हे ध्यानात घ्यायला हवे. नाहीतर लव्ह जिहादला बळी पडून मरावे परी तुकड्यांरूपी सुटकेसमध्ये उरावे या स्थितीला सामोरे जावे लागू शकते.
*************************************
दि. १४ ऑक्टोबर २०२०
मो. ९८२२९३९२८७

 

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...